गाय गोठा योजना 2024 :
नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन योजना ह्या ठिकाणीं घेऊन आलेला आहे . गाय गोठा योजनेबद्दल सविस्तर व अचूक माहिती आपण पुढे पाहणार आहोत. तर मित्रांनो गाय गोठा योजना 2024 साठी अर्जं प्रक्रिया हि सुरू झालेली आहे .
ह्या योजनेतून तुम्हाला 100% लाभ मिळणार आहे . ह्या योजनेतून गाय गोठा साठी तुम्हाला 77 हजार 500 रुपये इतके अनुदान मिळणार आहे .
तर मिञांनो योजनेसाठी अर्ज कसा करायचा , व पात्रता निकष काय असतील अशी संपुर्ण अर्ज प्रक्रिया आपण इथे पाहणार आहोत .
गाय गोठा योजना 2024 सविस्तर माहिती
बहुतांश शेतकऱ्यांकडे जनावरांसाठी व्यवस्थित निवारा नसतो. त्यामुळे जनावरे आजारी पडतात.
शेतकऱ्यांच्या जनावरांचे उनापासून , पावसापासून व वादळापासुन संरक्षण व्हावे या हेतूने शासनाने गाय गोठा अनुदान योजना राबविली आहे .
यासंदर्भात शासनाचा GR जाहीर करण्यात आलेला आहे . त्या माहितीनुसार राज्यात 2 ते 6 जनावरांचा गोठा उभारणी साठी सरकार कडून 77448 रुपये इतकी रक्कम अनुदानित केली जाते. तर मित्रानो याबद्दल ची साविस्तर महिती ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला मिळणार आहे .
गाय गोठा योजना 2024 शासनाचे उद्दीष्ट :
1) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे.
2) दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी स्वच्छ गोठा बांधणे.
3) गोठा बांधणी केल्यास जनावरांचे ऊन,पाऊस, वारा, यापासून संरक्षण होईल
4) शेतकऱ्याचा उत्पंनात वाढ करणे .
5)पशुपालन करणाऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे.
6) दूध व्यवसायासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे .
गाय गोठा योजना 2024
पात्रता निकष :
1) अर्जदार महाराष्ट्राचा रहिवाशी असला पाहिजे.
2) लाभार्थी कडे गोठा उभारणी साठी स्वतची जमीन असणे आवश्यक आहे.
3) एक कुटुंबाला एकदाच लाभ घेता येईल.
4) लाभार्थी हा ग्रामीण भागा तील शेतकरी असला पाहिजे .
5) याआधी जर एखद्या शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन गोठा बांधला असल्यास
6) आर्थिक स्थिती कमकुवत असलेला शेतकरी व पशुपालक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
आवश्यक कागद पत्रे :
- आधार कार्ड झेरॉक्स.
- मतदान कार्ड झेरॉक्स.
- रेशन कार्ड झेरॉक्स.
- जात प्रमाण पत्र झेरॉक्स.
- उत्पन्न दाखला
- पासपोर्ट फोटो
- बँक पास बूक झेरॉक्स.
- मोबाइल नंबर.
- ग्रामपंचायत शिफारस पत्र.
- जागेचे ७१२ /
- पशुधन असल्याचा दाखला.
- नरेगा (रोहयो) जॉब कार्ड.
- गोठा बांधणी अंदाजपत्र
- रहिवाशी
अर्ज प्रक्रिया :
योजनेची अर्जप्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क करावा लागेल.
तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक अथवा सरपंच यांच्या कडे तुमचा अर्ज सादर करावा लागेल.
आपल्या अर्जासोबत वरील कागदपत्रे जोडून सरपंच / ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे तुमचा अर्ज सादर करावा .
हे नक्की वाचा 👇
RRB TC bharti 2024 : रेल्वेत TC पदासाठी 11200 हून अधिक पदांची भरती