माननीय उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक मध्ये झालेल्या सभेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तसेच शेतकऱ्यांच्या विज बिल माफी बद्दल जनतेशी चर्चा केली .
माननीय उपमुख्यमंत्री जनतेशी संवाद करताना म्हणाले मी अनेक वर्षापासून सरकार मध्ये काम करतो,
तसेच विरोधी पक्षात काम करणारा एक कार्यकर्ता असुन राज्याचा विकास व्हावा म्हणून सदैव कार्यरत राहील.
राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा जनतेला सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात हीच माझी भावना आहे.
माझी लाडकी बहिण योजने विषयी बोलताना ते म्हणाले माझ्या राज्यातील सर्व बहिणी सक्षम व्हाव्यात “समाजात महिलांना प्रतिष्ठा मिळावी. अर्थसंकल्प सादर करताना मी याचा विचार केला.
या मुद्यावर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यां सोबत चर्चा केली. 2.50 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना मग ते कुठल्याही जाती-धर्माच असो.
ह्या योजनेचा लाभ घेता येणार यावर विचार केला” असं अजित पवार म्हणाले.
7 लाख कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.लाडकी बहिण योजने वर कीती खर्च येणार यावर विचार केला.
गरीबाला सक्षम करणे. मोल मजुरी , केर कडणाऱ्या धुणी भांडी करणाऱ्या माझ्या सर्व बहिणींना मला सक्षम करायच आहे.असे अजित पवार म्हणाले.
रक्षाबंधन ला मिळणार 3 हजार रूपये
ऑगस्ट सुरु झाला आहे. ऑगस्ट महिन्यात ज्या महिला पात्र ठरतील, त्यांना रक्षा बंधनाच्या जवळपास ऑगस्टमध्ये 3 हजार रुपये थेट त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये जमा होतील.
ही रक्कम, थेट महिलांच्या खात्यात जमा होणार असं अजित पवार म्हणाले.
ह्या योजनेसाठी 46 हजार कोटी रुपये खर्च येत आहे. हा एक चूनावी जुमला आहे, असे विरोधक म्हणत आहेत, मात्र हे असे अजिबात च नाहीये असे ते म्हणाले म्हणाले.
अर्थसंकल्पात शेतकरी राजा साठी सुध्दा त्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली.
शेतकरयांना दिलासा देत अजित पवार म्हणाले मागचं कृषीपंपा वीज बील माझ्यावर सोडा.
महायुती सरकारने शेतकऱ्यांना साडे सात हॉर्स पावर पर्यंत वीज बिल माफी दिली आहे.
मागचं थकीत वीज बिल सुध्दा भरायचं नाही. कोणी विचारले तर माझं नाव सांगून टाकायचं.
तुम्ही काळजी करु नका. औट घटकेच नाही, मी शब्दाचा पक्का आहे.
हा अजितदादाचा वादा आहे. मी कधीही शब्द फिरवत नाही. एकदा शब्द दिला तर वाट्टेल ती किंमत मोजतो, मागे हटत नाही” असं अजित पवार म्हणाले.