राज्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली असुन.पुढील तीन दिवस या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस येण्याची शक्यता,
आज मध्य महाराष्ट्रात व कोकण भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.
प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजा नुसार , पुढील तीन दिवस मराठवाड्यात काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यां सह मुसळधार पावसाचा इशारा प्रादेशिक हवामान केंद्राने सांगितला आहे .
16 जुलैपर्यंत मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता दर्शवली असून बहुतांश भागात हलक्या ते मध्यम प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता दर्शवली आहे.
भारतीय हवामान विभागाकडून मराठवाड्यात सर्व जिल्ह्यांना पुढचे तीन दिवस पावसाचा येलो अलर्ट सांगितला आहे .
जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात कसा असेल पाऊस –
प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई ने लावलेल्या अंदाजाप्रमाणे उद्या जालना , छत्रपती संभाजी नगर ,धाराशिव , नांदेड , बीड, सह परभणी आणि हिंगोलीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस येण्याची शक्यता आहे.
वाऱ्याचा वेग हा 30 ते 40 किलोमीटर प्रति तास राहणार असून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
14 जुलैचा पावसाचा अंदाज
14 जुलै रोजी राज्यातील परभणी , बीड, हिंगोली या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे तर छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, नांदेड, जिल्ह्यात हलक्या ते मध्यम प्रमाणात पाउस पडण्याची शक्यता सांगितली आहे .
15 जुलै –
15 जुलै ला लातूर, धाराशिव, हिंगोली, नांदेड जिल्ह्यामध्ये ढगांच्या गडगडाट व विजांच्या कडकडाटसह मुसळधार पाउस येण्याची शक्यता आहे.
तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम प्रमाणात पाउस पडेल असे सांगण्यात आले आहे .
16 जुलै –
छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी या तीन जिल्ह्यांत मुसळधार पाऊस येणार आहे .
तर हिंगोली, बीड, धाराशिव, नांदेड, लातूर ह्या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाट व हलक्या ते मध्यम प्रकारचा पाऊस येण्याची शक्यता आहे .
आयएमडी कडून सर्व विभागात यलो अलर्ट देण्यात आला आहे .
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांसाठी पुढचे तीन दिवस भारतीय हवामान केंद्राकडून यलो अलर्ट देण्यात आला असून ,
राज्यातील बहुतांश भागात पाऊस पडण्याची दाट शक्यता असल्याचे प्रादेशिक हवामान केंद्राने सांगितले आहे.
मराठवाडा तील जवळपास ९० टक्के पेरण्या पूर्ण आलेल्या असून प्रादेशिक हवामान केंद्राने विभागनिहाय तसेच जिल्हानिहाय पावसाचा हवामान अंदाज दिला आहे.
राजधानी मुंबईत पाणीच पाणी
मुंबई तसेच उपनगरात व परिसरातील जिल्ह्यामध्ये पावसाने पहाटेपासूनच दमदार हजेरी लावली आहे.
तर मुंबईत जिकडे पाहावे तिकडे पाणीच पाणी अशी स्थिती पाहायला मिळत आहे. मुंबईसोबतच मुंबई लगतचे जिल्हे पालघर, ठाणे, रायगड, नवी मुंबई भागातही पाऊस आल्याने नदी, नाले, बंधारे भरून वाहत आहेत.
रस्ते पाण्याने तुडुंब , जनजीवन झाले विस्कळीत
मुंबई शहर आणि उपनगरा त आज सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पावसामुळे रस्ते पाण्याने तुडुंब झालेले दिसून येत आहे. रस्त्यांवर सगळीकडे पाणीच पाणी झालेलं दिसून येत आहे.
नागरिकांना पाण्यातून मार्ग काढत आपली वाहने न्यावी लागत आहेत.ह्या पाण्यातून मार्ग काढत नागरिक प्रवास करतानाचे चित्र दिसून येत आहे.
मुंबई सह उपनगर आणि कोकण भागातही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे . रायगड जिल्ह्यातील अलिबाग मधे तर चक्क रुग्णालयातहि पाणीच पाणी झाले आहे.